प्रस्तावना :-

जेव्हा मोतिबिंदूमुळे दृष्टी कमी होते त्यावेळेस मोतिबिंदूचे Operation करण्याबद्दल सल्ला दिला जातो. मोतिबिंदू पिकल्यानंतरच मोतिबिंदूचे Operation करता येते हा समज चुकीचा आहे. मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेला (लेन्स सोबत / लेन्स शिवाय) संमती देत असतांना मी घोषित करतो/करते की खालील सांगितलेली माहिती मला पूर्णपणे कळलेली आहे.

१) पर्यायी उपचार :-

मोतिबिंदूच्या Operation नंतर दृष्टी परत येण्यासाठी तीन प्रकारच्या पद्धती उपलब्ध आहेत.
    (१) मोतिबिंदूनंतरचा जाडा चष्मा      (२) Contact Lens      (३) Intro -Ocular Lens

मोतिबिंदूच्या विना लेन्स ऑपरेशनच्या नंतर लागणारा चष्मा हा खूप जाडा असतो आणि अशा चष्म्यामुळे ३०% प्रतिमा मोठी दिसते. दुसरा डोळा सामान्य असल्यास अशा चष्म्यामुळे दोन प्रतिमा दिसू शकतात. Contact Lens मुळे प्रतिमा ८% मोठी दिसते आणि Contact Lens हाताळणे कठीण असते. एखाद्या व्यक्तीला Contact Lens सहन सुद्धा होत नाही. डोळ्यामध्ये टाकणाऱ्या भिंगामुळे (Intro - Ocular Lens) प्रतिमा मोठी दिसत नाही. शस्त्रक्रियेद्वारे हा भिंग नेहमीसाठी डोळ्यामध्ये स्थायी स्वरूपात बसवला जातो.

२) लेन्स (IOL) हा शस्त्रक्रियेद्वारे डोळ्यामध्ये बसवला जातो. (Laser द्वारे नाही.) टाकलेला लेन्स डोळ्यामध्ये स्थायी स्वरूपात राहतो. कधी कधी lens (IOL) टाकण्याची परवानगी असतांना सुद्धा शल्य चिकित्सक डोळ्यात lens (IOL) बसविणे हानिकारक ठरण्याची शंका निर्माण झाल्यास lens (IOL) न टाकण्याचा निर्णय घेऊ शकतात.

३) लेन्स (IOL) चा power मोजण्यासाठी A-Scan अथवा IOL Master चा उपयोग केला जातो. Operation नंतर छोटासा चष्म्याचा नंबर लागणे हे स्वाभाविक असते. Monofocal lens टाकल्यानंतर साधारणतः लांबच बघण्यासाठीचा नंबर कमी लागतो. पण वाचण्यासाठी चष्मा लागतो. (काही रुग्णांमध्ये शल्यचिकित्सक जवळची दृष्टी विनाचष्म्यांनी चांगली राहण्यासाठी स्वतःहून (Minus (-) नंबर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात.)
  Multifocal lens नंतर चष्म्यावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होते. पण छोटासा नंबर लागणे स्वाभाविक असते. साधारणतः या व्यक्तींना दोन भागाच्या चष्म्यांची गरज पडत नाही. या lens नंतर contrast vision थोडी कमी राहू शकते आणि शस्त्रक्रियेनंतर उजेडाभोवती वलय (Glare & Haloes) दिसू शकतात.
  ज्या व्यक्तींना cylindrical Number असतो अशा व्यक्तींना सामान्य Lens टाकल्यानंतर Axis चा नंबर लागणे (Cylindrical) स्वाभाविक असते. मोतिबिंदूचे Operation चा उद्देश डोळ्यातील धुरकट झालेले लेन्स काढून त्या ठिकाणी Artificial Lens टाकणे असते. चष्म्याचा नंबर पूर्णपणे काढणे हा उद्देश नसतो.

४) यशस्वी मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर येणारी दृष्टी ही मागच्या रेटीनांच्या स्थितीवर अवलंबून असते. जास्त असलेल्या मोतिबिंदूमुळे आधुनिक उपकरणांनी तपासणी करून सुद्धा मागच्या रेटीनाची स्थिती सामान्य आहे अशी खात्री करणे कठीण असते. मोतिबिंदू जात असलेल्या डोळ्यांमध्ये रेटीनाची स्थिती आणि शस्त्रक्रियेनंतर येणारी दृष्टी याचा कयास लावणे कठीण असू शकते.

५) आधुनिक उपकरणांमुळे आणि मायक्रोस्कोपीक शस्त्रक्रियेमुळे Complication ची संभावना ही फार कमी आहे. आणि झाल्यास साधारणतः औषधाद्वारे अथवा शल्यचिकित्सेद्वारे याचा उपचार करता येतो.

शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे दृष्टी जाण्याची संभावना ०.५% पेक्षा पण कमी असते. परंतु मानक पुस्तकांमध्ये सांगितल्याप्रमाणे खालील प्रकारची Complication शस्त्रक्रियेनंतर उद्भवू शकतात.

अ) Operation नंतर Lens च्या मागील पडद्यात धुरकटपणा आल्यास दृष्टी कमी होऊ शकते व त्यासाठी Yag Laser करण्याची गरज पडू शकते.

ब) डोळ्यांमध्ये रक्त उतरणे (Bleeding), लेन्स चा मागचा पडदा फाटणे (Posterior capsular Rent), मोतिबिंदू डोळ्याच्या मागच्या भागात पडणे (Nucleus Drop) जखम leak होणे (wound leakage), डोळ्यामध्ये सूज येणे (Uveitis), डोळ्यामधील बुबुळ खराब होणे (corneal decompensation), काचबिंदू होणे (glaucoma), Retina वर सूज येणे (Cystoid Macular oedama), Retina सरकणे (RD), भिंग सरकणे (IOL Dislocation/ IOL Decentration), डोळ्यामध्ये Infection होणे. (Endophthalmitis) या प्रकारचे complications उद्भवू शकतात. Lens जागेवरून सरकल्यास परत शस्त्रक्रिया करून जागेवर बसविण्याची गरज पडू शकते अथवा Lens काढण्याची पण गरज पडू शकते. जंतु संक्रमण न होण्याची पूर्णपणे काळजी घेऊन सुद्धा जंतु संक्रमणाची (Endophthalmitis) शक्यता नाकारता येत नाही. Operation नंतर दृष्टी कमी होण्याचा धोका नाकारता येत नाही.

क) कधीकधी मोतिबिंदूचे Operation phaco surgery द्वारे करण्याचे ठरविलेले असतांना सुद्धा, शल्यचिकित्सकाला या पद्धतीचा धोका वाटल्यास तो साध्या पद्धतीने (Extra capsular cataract surgery) करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

ड) सामान्य Complication - स्थानिक बधिरिकरणाच्या पद्धतीमध्ये जिवाला धोका उद्भवण्याची शक्यता ही ०.५% पेक्षाही कमी असते. ही शक्यता ज्या व्यक्तींना मधुमेह (DM), उच्च रक्तदाब (HT), हृदयाचा आजार अथवा बाकी काही आजारांमुळे वाढू शकते. औषधाची Reaction होण्याचा धोका नाकारता येत नाही. प्रत्येक Complication चा उल्लेख करणे हे अशक्य आहे. व त्यामुळे ही Complication ची यादी संपूर्ण असणे शक्य नाही.

शस्त्रक्रियेसाठी संमती :-