प्रस्तावना :- |
जेव्हा मोतीबिंदुमुळे दृष्टी कमी होते त्यावेळेस मोतीबिंदुचे Operation करण्याबद्दल सल्ला दिल्या जातो. मोतीबिंदु पिकल्यानंतरच मोतिबिंदुचे Operation करता येते हा समज चुकिचा आहे. मोतिबिंदुच्या शस्त्रक्रियेला (लेन्स सोबत / लेन्स शिवाय) संमती देत असतांना मी घोषित करतो / करते की खालील सांगीतलेली माहिती मला पुर्णपणे कळलेली आहे.
- पर्यायी उपचार :-
मोतीबिंदुच्या Operation नंतर दृष्टी परत येण्यासाठी तीन प्रकारच्या पद्धती उपलब्ध आहेत. (१) मोतीबिंदुनंतरचा जाडा चष्मा (२) Contact Lens (३) Intro -Ocular Lens मोतीबिंदुच्या विना लेन्स ऑपरेशच्या नंतर लागणारा चष्मा हा खुप जाडा असतो आणि अशा चष्म्यामुळे ३०% प्रतिमा मोठी दिसते. दुसरा डोळा सामान्य असल्यास अशा चष्म्यामुळे दोन प्रतिमा दिसू शकतात. Contact Lens मुळे प्रतिमा ८% मोठी दिसते आणि Contact Lens हाताळणे कठिण असते. एखाद्या व्यक्तिला Contact Lens सहन सुद्धा होत नाही. डोळ्यामध्ये टाकणाऱ्या भिंगामुळे ( Intro - Ocular Lens) प्रतिमा मोठी दिसत नाही. शस्त्रक्रियेद्वारे हा भिंग नेहमीसाठी डोळ्यामध्ये स्थायी स्वरूपात बसवल्या जातो.
- लेन्स (IOL) हा शस्त्रक्रियेद्वारे डोळ्यामध्ये बसवल्या जातो. (Laser द्वारे नाही.) टाकलेला लेन्स डोळ्यामध्ये स्थायी स्वरूपात राहतो.
कधी कधी lens (IOL) टाकण्याची परवानगी असतांना सुद्धा शल्य चिकित्सक डोळ्यात lens (IOL) बसविणे हानिकारक ठरण्याची शंका निर्माण झाल्यास lens (IOL) न टाकण्याचा निर्णय घेऊ शकतात.
3) लेन्स (IOL) चा power मोजण्यासाठी A-Scan अथवा IOL Master चा उपयोग केला जातो. Operation नंतर छोटासा चष्म्याचा नंबर लागणे हे स्वाभाविक असते. Monofocal lens टाकल्यानंतर साधारणत: लांबच बघण्यासाठीचा नंबर कमी लागतो. पण वाचणासाठी चष्मा लागतो. (काही रूग्णांमध्ये शल्यचिकित्सक जवळची दृष्टी विनाचष्म्यांनी चांगली राहण्यासाठी स्वतःहुन (Minus (-) नंबर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात. Multifocal lens नंतर चष्म्यावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होते. पण छोटासा नंबर लागणे स्वाभाविक असते. साधारणत: या व्यक्तींना दोन भागाच्या चष्म्यांची गरज पडत नाही. या lens नंतर contrast vision थोडी कमी राहु शकते आणि शस्त्रक्रियेनंतर उजेडाभोवती वलय (Glare & Haloes) दिसू शकतात. ज्या व्यक्तींना cylindrical Number असतो अशा व्यक्तींना सामान्य Lens टाकल्यानंतर Axis चा नंबर लागणे (Cylindrical) स्वाभाविक असते. मोतीबिंदुचे Operation चा उद्देश डोळ्यातील धुरकट झालेला लेन्स काढुन त्या ठिकाणी Artifical Lens टाकणे असते. चष्म्याचा नंबर पुर्णपणे काढणे हा उद्देश नसतो.
- यशस्वी मोतीबिंदुच्या शस्त्रक्रियेनंतर येणारी दृष्टी ही मागच्या रेटीनाच्या स्थितीवर अवलंबुन असते. जास्त असलेल्या मोतीबिंदुमुळे आधुनिक उपकरणांनी तपासणी करून सुद्धा मागण्या रेटीनाची स्थिती सामान्य आहे अशी खात्री करणे कठीण असते. मोतीबिंदु जास्त असलेल्या डोळ्यांमध्ये रेटीनाची स्थिती आणि शस्त्रक्रियेनंतर येणारी दृष्टी याचा कयास लावणे कठीण असु शकते.
- आधुनिक उपकरणांमुळे आणि मायस्क्रोस्कोपीक शस्त्रक्रियेमुळे Complication ची संभावना ही फार कमी आहे. आणि झाल्यास साधारणत: औषधाद्वारे अथवा शल्यचिकित्सेद्वारे याचा उपचार करता येतो.
शस्त्रक्रियेनंतर पुर्णपणे दृष्टी जाण्याची संभावना ०.५% पेक्षापण कमी असते. परंतु मानक पुस्तकांमध्ये सांगीतल्याप्रमाणे खालील प्रकारची Complication शस्त्रक्रियेनंतर उद्भवू शकतात. अ) Operation नंतर Lens च्या मागील परद्यात धुरकटपणा आल्यास दृष्टी कमी होऊ शकते व त्यासाठी Yang Laser करण्यीच गरज पडु शकते. ब) डोळ्यांमध्ये रक्त उतरणे (Bleeding), लेन्स चा मागचा पडदा फाटणे (Posterior capsular Rent ), मोतीबिंदू डोळ्याच्या मागच्या भागात पडणे (Nucleus Drop) जखम leak होणे ( wound leakage), डोळ्यामध्ये सुज येणे (Uveitis), डोळ्यामधील बुबुळ खराब होने (corneal decomposition), काचबिंदु होणे (glaucoma), Retina वर सुज येणे (Cystoid Macular oedama), Retina सरकणे (RD), भिंग सरकणे (IOL Dislocation/IOL Decantation), डोळ्यामध्ये Infection होणे. (Endopthalmitis) या प्रकारचे complications उद्भवू शकतात. Lens जागेवरून सरकल्यास परत शस्त्रक्रिया करून जागेवर बसविण्याचे गरज पडू शकते अथवा Lens काढण्याची पण गरज पडु शकते. जंतु संक्रमण न होण्याची पुर्णपणे काळजी घेऊन सुद्धा जंतु संक्रमणाची (Endopthalmitis) शक्यता नाकारता येत नाही. Operation नंतर दृष्टी कमी होण्याचा धोका नाकारता येत नाही. क) कधी कधी मोतीबिंदुचे Operation phaco surgery द्वारे करण्याचे ठरविलेले असतांना सुद्धा, शल्यचिकित्सकाला या पद्धतीचा धोका वाटल्यास तो साध्या पद्धतीने (Extra capsular cataracl surgery) करण्याचा निर्णय घेऊ शकतो. ड) सामान्य Complication स्थानिक बधिरीकरणाच्या पद्धतीमध्ये जिवाला धोका उद्भवण्याची शक्यता ही ०.५% पेक्षाही कमी असते. ही शक्यता ज्या व्यक्तिंना मधुमेह (DM), उच्च रक्तदाब (HT), हृदयाचा आजार अथवा बाकी काही आजारांमुळे वाढु शकते. औषधाची Reaction होण्याचा धोका नाकारता येत नाही. प्रत्येक Complication चा उल्लेख करणे हे अशक्य आहे. व त्यामुळे ही Complication ची यादी संपुर्ण असणे शक्य नाही. |
|
| |
शस्त्रक्रियेसाठी संमती :- |
- मी याद्वारे डॉ. प्रविण व्यवहारे/डॉ. निता व्यवहारे यांना व त्यांच्या साहय्यकांना माझ्या उजव्या / डाव्या डोळ्याचे टेरिजियमची शस्त्रक्रिया करण्यासठी संमती देत आहोत.
उपचारा दरम्यान व शस्त्रक्रिये दरम्यान वेळेवर उद्भवणाऱ्या समस्येवर / अडचणीवर डॉक्टरांना परिस्थिती प्रमाणे उपचार व सांगीतल्याशिवाय वेगळी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासू शकते याद्वारे मी अशी परिस्थिती निर्माण झाल्यास वेगळ्या प्रकारचे उपचार अथवा शस्त्रक्रिया करण्याची संमती देतो आहे.
- शस्त्रक्रियाची विधी उद्देश व त्यासाठी पर्यायी उपचार याबाबत मला पुर्ण माहिती देण्यात आली आहे व ती मला व्यवस्थित समजली आहे.
- मला/आम्हाला आजारपणाबद्दल / शस्त्रक्रियानंतर पूर्ण दिसण्याची किंवा स्वस्थ होण्याची शास्वती देण्यात आलेली नाही व त्याबाबत माझी कसलीही तक्रार राहणार नाही.
- आवश्यकतेनुसार Local Anasthesia (फक्त डोळा निर्जिव करणे) किंवा General Anasthesia (पुर्ण बेशुद्ध करणे) देण्याचा आम्ही डॉक्टरांना अधिकार दिला आहे. बेशुद्धकरणाचे काम जोखीमपूर्ण असले तरी दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी मी/ आम्ही बेशुद्ध करण्यास संमती देत आहोत.
बधिरीकरण तज्ञ व बेशुद्ध करण्याच्या पद्धतीबद्दल मला / आम्हाला संपुर्ण माहिती देण्यात आली आहे. या पद्धतीत अनेक अडचणी (Complication) उद्भवू शकतात.
उदाहरणार्थ :- श्वसनक्रियेत अडथळा, औषधाचे दुष्परिणाम, पक्षपात, मेंदु रक्तस्त्राव, हृदय व फुफ्फुस क्रिया बंद पडणे व/वा मृत्यु तसेच स्वरपेटी खराब होणे. दात किंवा डोक्याला जखमा होण्याची शक्यता असणे.
- मी आवश्यक असणाऱ्या औषधांना व Infusions ला देण्याची याद्वारे संमती देतो आहे.
- मी वैज्ञानिक किंवा शैक्षणिक उद्देशासाठी माझ्या शस्त्रक्रियेला दुसऱ्याला बघु देण्याची Photo काढण्याची व T.V. वर प्रसारीत करण्याची संमती देतो आहे. (यामध्ये माझा परिचय प्रकट न होण्याची अट राहील.)
- शस्त्रक्रियेदरम्यान काढलेल्या शरीराच्या भागात किंवा उतक (Tissue) ला मानक पद्धतीद्वारे विल्हेवाट लावण्याचे संमती देतो आहे.
खालील सही करणारा (रुग्ण किंवा रूग्णांचे जवळचे नातेवाईक) याद्वारे संभावित Complication आणि दृष्टी कमी येण्याच्या पुवकल्पनेची संपुर्ण माहिती असुन सुद्धा माझ्या उजवा / डावा डोळ्याच्या (Operation) शस्त्रक्रियेची संमती देत आहे. मी प्रमाणित करतो की, मी हि यादी, संमतीपत्र पुर्ण वाचले आह/वाचुन दाखवले आहे आणि माझ्या मातृभाषेत मला समजावुन सांगीतल्या गेले आहे. मी सही करण्याआधी सर्व खाली जागा भरल्या आहेत. वाक्य पुर्ण लिहिली आहेत; आवश्यकता नसलेल्या गोष्टी खोडल्या आहेत. डॉक्टरांनी माझ्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिली आहेत. |
|
| |
| नातेवाईक /साक्षीदार सही १) |
२) |
| |
| २)रुग्णाची सही |
| |
| नाव १) |
|
| |
|
| नाव १) |
नाव२) |
| |
|
| नाव १) |
नाव२) |
| |
|
डॉक्टरांचे द्वारा घोषणा
मी घोषणा करतो की, मी करण्यात येणारी उपचार पद्धती व शस्त्रक्रिया यांच्या परिणामांविषयी आणि कार्यपद्धतीविषयी माहिती दिली आहे आणि या रूग्णा संबंधीत Complication बद्दल चर्चा केली आहे. मी रूग्णाला प्रश्न विचारण्याचा वेळ दिला आहे आणि त्याचे समाधानकारक उत्तर दिले आहे.
डॉक्टरची सही
तारीख : .......................................... |